पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लेख क्र. ४ दलितांच्या प्रवर्तनाचे प्रवाही नाट्यचित्र : युगयात्रा

दलितांच्या प्रवर्तनाचे प्रवाही नाट्यचित्र : युगयात्रा....... डॉ.मिलिंद माणिकराव वाव्हळे, मराठी विभाग, मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद.) मो. 9421678635 मिलिंद कला महाविद्यालयाच्या अमॄत महोत्सवानिमित्त प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी लिहिलेल्या 'युगयात्रा' या नाटकाचा प्रयोग बऱ्याच वर्षांनी जवळपास 68 वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर सादर होत आहे. या नाट्य सादरीकरणाचे पहिल्या प्रयोगापासून ते आजच्या चौथ्या प्रयोगाचे ( माझ्या माहितीप्रमाणे ) एक विशेष आहे ते म्हणजे या नाटकात भूमिका साकारणारे सर्व कलावंत हे मिलिंद महाविद्यालयाचे तत्कालीन विद्यार्थी व प्राध्यापक होते तर आजही या नाटकात भूमिका साकारणारे सर्वच कलावंत (अगदी मी स्वतः या नाटकात धनसेठी व धनश्रेष्ठीची भूमिका साकारत आहे.) हे मिलिंद कला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक आहेत.. त्यामुळेच 'युगयात्रा' हे नाटक रंगभूमीवर सादर व्हावे यासाठी सातत्याने धिरोदात्तपणे सर्व कलावंतांच्या पाठीशी असणाऱ्या आदरणीय प्राचार्य...