पोस्ट्स

लेख क्र. ४ दलितांच्या प्रवर्तनाचे प्रवाही नाट्यचित्र : युगयात्रा

दलितांच्या प्रवर्तनाचे प्रवाही नाट्यचित्र : युगयात्रा....... डॉ.मिलिंद माणिकराव वाव्हळे, मराठी विभाग, मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद.) मो. 9421678635 मिलिंद कला महाविद्यालयाच्या अमॄत महोत्सवानिमित्त प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी लिहिलेल्या 'युगयात्रा' या नाटकाचा प्रयोग बऱ्याच वर्षांनी जवळपास 68 वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर सादर होत आहे. या नाट्य सादरीकरणाचे पहिल्या प्रयोगापासून ते आजच्या चौथ्या प्रयोगाचे ( माझ्या माहितीप्रमाणे ) एक विशेष आहे ते म्हणजे या नाटकात भूमिका साकारणारे सर्व कलावंत हे मिलिंद महाविद्यालयाचे तत्कालीन विद्यार्थी व प्राध्यापक होते तर आजही या नाटकात भूमिका साकारणारे सर्वच कलावंत (अगदी मी स्वतः या नाटकात धनसेठी व धनश्रेष्ठीची भूमिका साकारत आहे.) हे मिलिंद कला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक आहेत.. त्यामुळेच 'युगयात्रा' हे नाटक रंगभूमीवर सादर व्हावे यासाठी सातत्याने धिरोदात्तपणे सर्व कलावंतांच्या पाठीशी असणाऱ्या आदरणीय प्राचार्य...

लेख क्र.3 ‘मिलिंद’च्या साहित्यिक परंपरेतील संवेदनशील ह्दयाचा सह्दयी लेखक : प्र. ई. सोनकांबळे

‘मिलिंद’च्या साहित्यिक परंपरेतील संवेदनशील ह्दयाचा सह्दयी लेखक : प्र. ई. सोनकांबळे प्रा. डॉ. मिलिंद माणिकराव वाव्हळे  मराठी विभाग,  मिलिंद कला महाविद्यालय,  नागसेनवन, औरंगाबाद मो. 9421678635 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. ही घटनाच तत्कालीन अंध:कारमय मराठवाड्याची स्थिती पाहता क्रांतिकारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या कार्यातूनच प्रत्यक्षपणे औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यामुळेच तर अक्षर ज्ञान नसलेल्या हजारो दलितांच्या जीवनात क्रांतिकारी बदलाचे वारे वाहू लागले आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञानाच्या निळ्या पहाटेचे तांबंड फुटू लागले. हजारो वर्ष अज्ञानाच्या अंध:काराच्या गर्तेत जीवन जगणाऱ्या दलित समाजात ज्ञानाची स्थित्यंतरे झाली आणि याच स्थित्यंतराचा परिणाम म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘मिलिंद’च्या सृजनशील, संस्कारशील, मातीत                  डॉ. बाबासाहेबांच्या वैचारिक प्रेरणेतून बीजारोपण हो...

लेख क्र. 2 मिलिंद महाविद्यालयाची अमॄतमहोत्सवी वाटचाल.

मिलिंद महाविद्यालयाची अमृत महोत्सवी वाटचाल प्रा. डॉ. मिलिंद माणिकराव वाव्हळे  मराठी विभाग  मिलिंद कला महाविद्यालय,  नागसेनवन, औरंगाबाद मो. 9421678635 “जगप्रसिद्ध अजिठ्यांची लेणी सांगते तथागताची गाथा,  ‘मिलिंद’ च्या गौरवशाली परंपरेपुढे सदैव झुकतो माथा ।।’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई ची स्थापना केली या संस्थेने मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे 19 जून 1950 रोजी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आज       दि. 19 जून 2024 रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेला 74 वर्षे पूर्ण होऊन मिलिंद महाविद्यालय त्याच्या अमृत (75 व्या) महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. ही आपल्या सर्व आंबेडकरी अनुयायांसाठीच नव्हे तर मिलिंदच्या सृजनशील मातीतून संस्कारशील शिक्षणाची, ज्ञानाची शिदोरी घेऊन आपल्या प्रचंड गुणवत्तेच्या बळावर समाजजीवनात ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट असा ठसा निर्माण केला व ‘मिलिंद’च्या संस्काराची महती आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिली अशा प्रत्येक ‘मिलिंदियन’ विद्यार्थ्यांसाठी हा क्षण...

लेख क्रमांक १. शब्द

            'शब्द'. व्याकरणाच्यादृष्टीने अडीच अक्षरी असलेल्या या शब्दाला मानवी समाजजीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. 'शब्द' या अडीच अक्षरी शब्दात तसे पाहिले तर समग्र मानवी जीवन कवेत घेण्याचे सामर्थ्य आहे कारण या शब्दांशिवाय आपल्या जीवनाला, वर्तनाला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. व्याकरणाच्यादृष्टीने अनेक अक्षरांचा समूह म्हणजे 'शब्द' अशी प्रातिनिधिक व्याख्या केली जात असली तरी या शब्दांचे महत्व ज्याला समजले तो जगज्जेता झाल्याशिवाय राहणार नाही. शब्दांचे साम्राज्यच इतके विस्तीर्ण आहे की,भल्याभल्यांना ते साम्राज्य आपल्या कवेत घेता आले नाही. एवढे मात्र खरे की, ज्याने ज्याने या शब्दांच्या साम्राज्याला कवेत घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या व्यक्तिमत्वाला शब्दांनी मात्र निश्र्चितच आकार दिला आहे. त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी ओळख करून दिली ती शब्दांनीच !                         एखाद्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी एखाद्याचे शब्द जसे कारणीभूत असतात. तसेच एखाद्याचे व्यक्तिमत्व बिघडण्यासही ...

'नक्षत्रांची फुले' ब्लाॅग लेखन मनोगत..

मित्रांनो, नमस्कार.. मी डॉ.मिलिंद माणिकराव वाव्हळे, मराठी विभाग, मिलिंद कला महाविद्यालय,नागसेनवन, औरंगाबाद. मी माझ्या 'नक्षत्रांची फुले' या ब्लाॅगवरुन आपल्याशी साहित्यिक, सामाजिक, ऐतिहासिक अशा साहित्य,समाज आणि संस्कॄतीशी निगडीत  विविध विषयांवर हितगुज साधणार आहे..या ब्लाॅगच्या माध्यमातून माझ्या मनातील वरील विषयांवरील मुक्त चिंतन मी आपल्या सोबत शेअर करणार आहे.. तेव्हा  'नक्षत्रांची फुले' या ब्लाॅगच्या मालिकेत लवकरच भेटू.. धन्यवाद...